Gender Equality : महिलांच्या नोकरीमुळे पुरुषांना मानसिक ताण (Mental Stress) येतो का? आम्ही कोणतीही जुनी विचारसरणी सांगत नाही आहोत. कारण एका अभ्यासाच्या आधारे काढलेला हा निष्कर्ष आहे. एकीकडे रिलेशनशिप, वर्क कल्चर, फेमिनिझम (Feminism), कपल गोल यासारखे ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत असताना, दुसरीकडे यासारख्या संशोधनातून हे स्पष्ट होते की आपण अजूनही लैंगिक भूमिकांबाबत (Gender Equality) किती पुराणमतवादी आहोत. सामान्य घरात, पुरुषाने जास्त कमावले किंवा तेवढेच कमावले तर चांगले मानले जाते, पण जर स्त्रीने तीच भूमिका पुरूषांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने पार पाडली तर काय होते? (Why is male ego hurt if women salary is higher)
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या जर्नलमध्ये युरोपियन सोशल सर्व्हेचा डेटा प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात 14 वर्षांचा डेटा गोळा करण्यात आला. हे सर्वेक्षण रोजगार ट्रेंड आणि लैंगिक भूमिकांनुसार सांगण्यात आले आहे.
स्त्रियांच्या कमाईने पुरुषांना समाधान मिळत नाही
या अभ्यासात 42000 कार्यरत वयोगटातील लोकांचा डेटा काढण्यात आला आहे. यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्नही विचारण्यात आले आणि सर्वसामान्य घरातील मानसिक तणाव कशामुळे येतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये लोकांना ते त्यांच्या आयुष्यात किती आनंदी आहे हे विचारण्यात आले. 0 ते 10 पर्यंतचे क्रमांकही देण्यात आले. बहुतेक लोकांनी या प्रश्नाला 5 ते 6 च्या दरम्यान नंबर दिले.
या अभ्यासात हेही समजले की, जर्मनीमध्ये जर महिलांनी घराचा खर्च उचलला तर पुरुषांवर जास्त ताण येतो. त्यानंतर युनायटेड किंगडम, आयर्लंड आणि स्पेन या देशांचा क्रमांक लागतो. ही समस्या युरोपातील जवळपास सर्वच देशांमध्ये आहे. एवढेच नाही तर फिनलंडसारख्या आनंदी देशातही ही समस्या दिसून आली आहे.
पुरुषांचा त्रास का होतो?
इथे कुठेतरी पुरुषी अहंकार आडवा येतो असे मी म्हणेन. जेव्हा स्त्रिया त्यांच्यापेक्षा जास्त कमावतात किंवा त्यांच्याकडे कोणतीही नोकरी नसते तेव्हा पुरुष स्त्रियांपेक्षा जास्त अस्वस्थ होतात. याचे कारण असे की पुरुषांना महिलांनी कमाई करणे अधिक मानसिक ओझे वाटते. बऱ्याच पुरुषांना महिला काम करतात याचं वाईट वाटते आणि त्यांना पुरूषार्थ जागा होतो. स्त्रियांचे काम करणे पुरूषी अहंकाराला शोभत नाही असा त्यांना समज असतो.
नोकरी नसलेल्या पुरुषांनाही त्यांचे पार्टनर ऑफिसला जाताना पाहून वाईट वाटते. त्यांना फक्त स्वतःबद्दल विचार करून वाईट वाटते आणि त्यांना वाटते की घरात आपला आदर केला जात नाही. इथे जर त्यांचा जोडीदारही बेरोजगार असेल तर त्यांच्या स्वाभिमानाला तितकासा धक्का बसत नाही. केवळ नोकरी नसल्यामुळे मानसिक ताणतणाव असलेल्या भागीदारांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणे आणि त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे कठीण जाते. आपल्यासोबत चुकीचं घडतंय असं त्यांना वाटतं आणि अशात पुरुषांना स्वतःबद्दल शंकाही येऊ लागतात.
इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की काम करताना पुरुषत्व नेहमीच आडवं येते. पुरुषांना लहानपणापासूनच घर सांभाळायचे आणि पैसे कमवायचे शिकवले जाते आणि महिलांना चूल आणि मुल हेच त्यांच सर्वस्व आहे हे सांगितले जाते. अभ्यासात असे समोर आले आहे की, ज्या पुरुषांचा जोडीदार घरखर्चाची काळजी घेत होता, त्यांच्यापैकी बहुतांश पुरुषांवर मानसिक ताण जास्त होता आणि त्यांनाही असे वाटत होते की ते पुरेसे महिलांवर अवलंबून आहेत.
2023 मध्येही असे अहवाल समोर येत आहेत हे समानतेच्या दृष्टिने फार विचित्र आहे. लिंगविशिष्ट भूमिकांचा विचार करणे आणि पत्नी किंवा गर्लफ्रेंडच्या पैशाबद्दल मत्सर करणे हा पुरुषी स्वभाव येणाऱ्या काळासाठी घातक ठरू शकतो. कारण आजकाल कोणतीही महिला असो ग्रामीण भागातील असो वा शहरी तिला स्वतंत्र जगायला, आपलं मत मांडायला आणि आर्थिकदृष्ट्या सशक्त व्हायला आवडते..