Deepika Padukone Relationship Tips : एका जुन्या मुलाखतीत, अभिनेत्री दीपिका पदुकोण किती स्ट्रेसमध्ये होती हे तिने स्वत: सांगितले होते. अनेकदा हा स्ट्रेस नात्यातील काही चढउतारांमुळे येतो. दीपिका पदुकोण मानसिक आरोग्यावर सतत काम करत असते. दीपिकाही एका क्षणी डिप्रेशनमधून गेली होती असे तिने स्वत: जाहिर देखील केले आहे. दिपिकाने अनेकदा त्या वेदनादायक दिवसांची आठवण करून दिली आणि त्या काळात तिच्या मनात आत्महत्येचे विचार कसे यायचे ते सांगितले. नैराश्याच्या लढाईतून ती कशी बाहेर आली आणि पुन्हा आयुष्य जगायला कशी शिकली हे अभिनेत्रीने प्रेक्षकांसोबत शेअर कले आहे.(3 Reasons Why People Cheat In Relationships)
दीपिकाने रिजेक्शन बद्दल बोलत असताना कुणाचे नाव घेतले नाही, परंतु तिच्या आयुष्यातले खरे प्रसंग तिने प्रेक्षकांसमोर ठेवले. देशात मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी एनजीओची स्थापना करणाऱ्या दीपिका पदुकोणने आईच्या मदतीने नैराश्याची लढाई जिंकली. दीपिकाने सांगितले की, जेव्हा ती या सगळ्यातून जात होती, तेव्हा तिच्या आईने तिची वेदना समजून घेतली आणि तिला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत केली.
डिप्रेशनच्या काळात दीपिकाला सारखे तिचे जुने दिवस आठवाचे. मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान ती म्हणाली, ‘मी विनाकारण तुटत होती. माझ्या आयुष्यातील त्या दिवसात मला उठाव वाटत नव्हतं, फक्त झोपायचे कारण शोधत होती कारण झोप मला शांत ठेवत होती’.
फसवणूक ही अशी गोष्ट आहे जी कोणत्याही नातेसंबंधात नेहमीच अस्वीकार्य असेल. नातेसंबंधात या फेजमधून जाताना भावनिकरित्या आपण पुर्ण खचून जात असतो. अशा वेळी आपल्याला चार्च होण्याची गरज असते. एखादी व्यक्ती कधीही तुम्हाला सोडून जावू शकते म्हणून तुम्ही त्याचे समर्थन करू नका. पण जे झालं त्याचा स्विकार करा त्यामागची कारण शोधून काढा. नेहमी स्वत:ला त्रास करून न घेता आपलं जीवन आपल्या पद्धतीने शिकायला हवं.
लोक फसवणूक का करतात याची तीन सामान्य कारणं आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहेत आणि ते तुम्हाला तुमचा जोडीदार किंवा तुमचे स्वतःचे वर्तन समजण्यास मदत करू शकतात.
1. भावनिक वियोग ( Emotional disconnection)
लोक फसवणूक करण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे जेव्हा त्यांना त्यांच्या जोडीदारापासून भावनिकरित्या डिस्कनेक्ट वाटतो. कालांतराने, विविध कारणांमुळे कपल भावनिकदृष्ट्या दूर होतात, ज्यात संवादाचा अभाव, निराकरण न झालेले संघर्ष किंवा फक्त वेगळे होण्याचे कारण पुरेसे असते. जेव्हा एखाद्याला भावनिकदृष्ट्या दुर्लक्षित वाटते, तेव्हा ते त्यांच्या प्रेझेंट नातेसंबंधातील पोकळी भरून काढण्याचा मार्ग म्हणून ते जवळीक शोधू लागतात पण अशी व्यावहारिकरित्या केलेली जवळीक जास्त काळ टिकत नाही आणि काही काळानंतर अशा नात्यांमध्ये भावनिक वियोग निर्माण होतो.
2. समाधानाचा अभाव ( Lack of satisfaction)
लोक फसवणूक करण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांच्या सध्याच्या नातेसंबंधातील लैंगिक किंवा भावनिक असंतोष. जेव्हा व्यक्तींना त्यांच्या पार्टनरच्या शारीरिक किंवा भावनिक पैलूंबद्दल असमाधानी वाटत असते, तेव्हा ते नातेसंबंधाबाहेर कंफर्ट शोधण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये शारिरीक आकर्षणाची जोड असेल तर असे नाते कमी आयुष्याचे असते. कपल्समध्ये भावनिक आणि शारिरीक दरी निर्माण झाली की यातून असमाधानाची भावना निर्माण होते. अशा काळात एकमेकांना दोष देणे किंवा वारंवार वाद घालणे असे प्रकार नात्यात दिसून येतात. अशा नात्याच एकमेकांना समजून न घेणे किंवा दोघांच्याही भावना एकमेकांपुढे व्यक्त न झाल्याने नात्यात रिजेक्शनचा सामना करावा लागू शकतो.
3. वैयक्तिक समस्या आणि असुरक्षितता (Personal issues and insecurities)
कधीकधी, लोक त्यांच्या वैयक्तिक समस्या आणि असुरक्षिततेमुळे फसवणूक करतात. या समस्यांमध्ये कमी आत्मसन्मान, आत्मीयतेची भीती किंवा दुसर्याकडून प्रमाणीकरणाची इच्छा यांचा समावेश असू शकतो. फसवणूक त्यांना असुरक्षिततेपासून आराम दूर घेवून जाते परंतु हे समाधान तात्पुरत्या काळासाठी असते. ज्यामुळे व्यक्तीला त्या क्षणी इच्छित कृत्य केल्याचा किंवा निर्णय घेतल्याचे समाधान वाटू लागते. परंतु या कृतींमुळे आणखी अपराधीपणा येतो आणि भावनिक अशांतता निर्माण होते. पुरूष असो वा महिला नात्यात असुरक्षितता निर्माण झाल्यास रिजेक्शनचा सामना कारवा लागू शकतो हे लक्षात ठेवावे.