Disadvantages Of Late Marriages : लग्न हा कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. म्हणूनच, लोक लग्न करण्यापूर्वी योग्य जोडीदार शोधण्यासाठी पुरेसा वेळ घेतात. पण अलिकडे करिअर, अभ्यास आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे लोक उशिरा लग्न करणे पसंत करतात. पण, अशा लोकांना अनेकदा त्यांचे पालक, कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांकडून लवकरात लवकर लग्न करण्याचा सल्ला मिळतो. लग्न हा वैयक्तिक निर्णय असल्याने, जेव्हा एखाद्याला लग्नाशी संबंधित टिप्स किंवा सल्ला मिळतो तेव्हा ती व्यक्ती चिडचिड करू शकते. पण तुम्हाला माहित आहे का की नातेवाईकांचा हा सल्ला पूर्णपणे अतार्किक किंवा चुकीचा नाही.
नातेसंबंध तज्ञांचे म्हणणे आहे की उशीरा लग्नाचे काही तोटे आहेत जे लोकांच्या विवाहित नातेसंबंधावर परिणाम करू शकतात. लग्नाला उशीर करणं योग्य का नाही आणि उशिरा लग्न करणाऱ्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते हे आपण आज जाणू घेऊया. जे लोक उशीरा लग्न करतात त्यांना त्यांच्या नातेसंबंधात या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
छोट्या छोट्या गोष्टींवर वाद
वयाच्या 30 किंवा 40 नंतर लग्न करणाऱ्या लोकांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून वारंवार भांडणे होण्याची शक्यता असते. खरं तर, या लोकांना एकमेकांना समजून घेण्यासाठी विशेष वेळ मिळत नाही. त्यामुळे लहानसहान बाबींवरही ते एकमेकांशी समन्वय साधू शकत नाहीत आणि साध्या साध्या गोष्टींचेही वादात रूपांतर होते.
मतभेद आणि संघर्ष
उशिरा लग्न करणाऱ्यांच्या जीवनानुभवामुळे आणि परिपक्व विचारसरणीमुळे, त्यांना अनेकदा या समस्येचा सामना करावा लागतो की ते त्यांच्या जोडीदाराच्या विचारांशी सहमत होऊ शकत नाहीत. आपापल्या परीने आयुष्य जगणारी दोन माणसे जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांचे विचार, आवडी-निवडी आणि अहंकार वारंवार नात्यांमध्ये अडथळे आणतात आणि त्यामुळेच अनेकदा त्यांच्या जोडीदाराशी वाद होतात.
वंध्यत्व
ही एक अशी समस्या आहे जी आज जगभरातील जोडप्यांना भेडसावत आहे. वयाने मोठे असलेल्या जोडप्यांना गर्भधारणा करणे सोपे नसते. अशा लोकांना पालक बनण्यात अडचण येऊ शकते कारण 30-35 वर्षांच्या वयानंतर स्त्री-पुरुषांमध्ये प्रजनन क्षमता कमी होऊ लागते आणि त्यामुळे त्यांना गर्भधारणा करणे खूप कठीण होते.