Emotional Intimacy in Relationship : नातेसंबंधात अनेक अप्स आणि डाऊन येतात. परंतु पुढे जाण्याचा मार्ग म्हणजे त्याला वेळ देणे आणि त्याचे पालनपोषण करणे. पण नात्याला वेळ देवून पुढे नेणं एवढ सोप नाही. कोणत्याही प्रकारचे नाते अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी भावनिक घनिष्ठतेची आवश्यकता असते. आपल्या नात्यासाठी आणि आनंदासाठी भावनिक जवळीक आवश्यक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? भावनिक जवळीक हा नात्याचा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि तो विशेषतः महिलांसाठी महत्त्वाचा आहे असे मानले जाते. (Don’t compromise your self-respect and self-esteem while seeking emotional intimacy in relationship)
महिलांसाठी भावनिक जिव्हाळा खूप महत्त्वाचा
महिला त्यांच्या पार्टनर, मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशी भावनिक संबंध आणि संवाद साधण्याची इच्छा बाळगतात. भावनिक जवळीक ही महिलांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. कारण इमोशनल होणे हा महिलांचा नैसर्गिक स्वभाव आहे. ज्या स्त्रिया त्यांच्या जोडीदारांसोबत भावनिक जवळीक वाढवतात त्यांच्यात तणाव, चिंता आणि नैराश्य कमी असते. महिलांसाठी भावनिक जिव्हाळा खूप महत्त्वाचा आहे जो साध्य करण्यासाठी त्या अनेकांना आव्हानांचा सामना करायला देखील मागे पुढे पाहत नाही.
लैंगिक भूमिकांबद्दलच्या सामाजिक अपेक्षा
सर्वात मोठे आव्हान म्हणजे लैंगिक भूमिकांबद्दलच्या सामाजिक अपेक्षा. स्त्रिया सहसा काळजीवाहू असण्याची अपेक्षा केली जाते आणि यामुळे त्यांच्या भागीदारांसोबत भावनिक संबंधासाठी त्यांनी थोडा वेळ द्यावा अशी अपेक्षा असते. स्त्रियांवर नेहमी त्यांच्या स्वतःच्या भावनिक गरजांपेक्षा इतरांच्या गरजांना प्राधान्य देण्याचा दबाव असतो हे तुम्ही आपल्या आजुबाजूला पाहिले असेल. आणखी एक आव्हान म्हणजे हार्मोन्समधील अडथळे जेथे स्त्रियांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यात अडचण येऊ शकते, विशेषतः जर त्यांना भूतकाळात आघात किंवा नकारात्मक अनुभव आले असतील, तर ते शेअर करताना त्या घाबरतात. याव्यतिरिक्त, काही स्त्रिया असुरक्षित फिल करतात आणि त्यांना नातं बिघडण्याची चिंता असते म्हणून त्या फक्त इतरांच्याच भावनांचा विचार करत असतात आणि स्वत:च्या भावना भीतीपोटी दाबून ठेवतात.
रोमँटिक असो वा प्लॅटोनिक असो, आपल्या नातेसंबंधांमध्ये आपण भावनिक जवळीक कशी जोपासू शकतो? याबद्दल काही गोष्टी जाणून घेवूया.
भावनिक जवळीक म्हणजे काय?
भावनिक जवळीक म्हणजे तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीसोबत जाणवणारी जवळीक – ती जोडीदार, पालक, मूल किंवा मित्रासोबतही असू शकते. त्याच्या/तिच्या दोषांसह आपण कोण आहात हे ओळखले जाण्याची आणि स्वीकारण्याची ही भावना या नात्यात असते.
तुम्ही सर्वात सुरक्षित आणि आनंदी असल्याची भावना या लोकांसोबत असताना येत असेल तर ते तुमच्या जवळचे आहेत असे तुम्ही समजता. जेव्हा तुम्ही एखाद्याशी भावनिकदृष्ट्या जवळीक साधता तेव्हा तुम्हाला त्यांच्याशी अधिक बोलावे किंवा भेटावे वाटते. तुम्हाला असे वाटते की तुम्ही त्यांच्या आजूबाजूला असले पाहिजे किंवा तो सतत तुमच्या सोबत असला पाहिजे. अशा प्रकारचे कनेक्शन तुमचे नाते अधिक घट्ट आणि अधिक परिपूर्ण बनवू शकते.
विश्वास आणि आदर हा भावनिक जवळीकीचा पाया
कोणत्याही नातेसंबंधात एकमेकांशी जोडलेले आणि गुंतलेले असणे महत्त्वाचे असते. याचा मुख्य घटक म्हणजे तुमच्या जोडीदाराचे भावनिक अनुभव जाणून घेणे आणि समजून घेणे. जर एखादी व्यक्ती तुमच्या भावना न सांगता ओळखत नसेल तरी ती तुमबाबत गंभीर आहे हे लक्षात येते. हिच गोष्ट पुरुषांनी किंवा महिलांना समजून घेणे गरजेचे असते. कारण विश्वास आणि आदर हा भावनिक जवळीकीचा पाया आहे.
समजुतदारपणा नात्यात महत्वाची भूमिका बजावतो
जेव्हा तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला त्यांच्यासोबत सुरक्षित वाटते. तुम्हाला माहित असते की तुमच्यासाठी समोरचा काहीही करायला तयार असणार आहे, काहीही झाले तरी तो तुम्हाला न्याय देणार हा तुमचा विश्वास असतो. पण कधी कधी या विश्वासाला तडा जावू शकतो. तेव्हा तुमचे वर्तन आणि तुमचा समजुतदारपणा नात्यात महत्वाची भूमिका बजावतो हे लक्षात ठेवा. एखादा तुमच्यावर एवढा विश्वास दाखवत असेल तर तो विश्वास जपा आणि त्या नात्याचा आदर करा. मुक्त संवाद, प्रामाणिकपणा आणि सातत्य याद्वारे कालांतराने नात्यात विश्वास निर्माण केला जाऊ शकतो हे लक्षात ठेवा.
त्या नात्याला सहज टाटा-बाय म्हणता येत नाही
भावनिक अनुभव काढून टाकल्याने अंतर निर्माण होऊ शकते आणि आपण एखाद्यापासून कायमचे डिस्कनेक्ट होऊ शकतो असा विचार करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. एकदा आपण कुणाशी भावनिकरित्या कनेक्ट झालो की त्या नात्याला सहज टाटा बाय म्हणता येत नाही. त्या नात्याच्या आठवणीतून बाहेर पडाला वेळ लागतो. हा वेळ न मोजता येण्यासारखा आहे. कारण कुणी अति प्रॅक्टिकल असेल तर तो या नात्यातून किंवा या भावनिक गुंत्यातून लवकर बाहेर पडतो, परंतु दर एखादी व्यक्ती भावनिक असेल तर तिला अशा संबंधातून बाहेर पडताना त्रास होतो किंवा खूप वेळ लागतो.
हेतू, वेळ आणि प्रयत्नांची गुंतवणूक
भावनिक घनिष्ठतेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याचा आदर करता तेव्हा तुम्ही त्यांच्याशी सन्मानाने आणि वैचारिकतेने वागता. तुम्ही त्यांच्या मतांना आणि भावनांना महत्त्व देता आणि ते नातेसंबंधांमध्ये सुरक्षिततेची आणि सहजतेची भावना निर्माण करण्यास मदत करते. विश्वास आणि भावनिक जवळीक निर्माण करण्यासाठी हेतू, वेळ आणि प्रयत्नांची गुंतवणूक करावी लागते. जेव्हा तुम्ही या तिन गोष्टींची गुंतवणूक करता तेव्हा ती परिपूर्ण नातेसंबंधाचा मजबूत पाया बनत असते.
भावनिक जवळीकतेला किती महत्व द्यावे
बर्याचदा लोक परिस्थितीकडे अधिक व्यावहारिक दृष्टीकोनातून बगतात. अशा वेळी समोरच्याला तुमच्या भावनिक जवळीची गरज नसते हे समजून घ्या यामुळे तुमचा स्वाभिमान राखला जाईल. तुमच्या जोडीदाराच्या भावनिक जवळीकतेला कितपत प्रतिसाद द्यावा हे पुर्ण तुमच्यावर अवलंबून असते. तेव्हा स्त्री असो वा पुरुष आपला स्वाभिमान आणि आत्मसम्मान पणाला लावून भावनिक संबध तयार करू नका. नात्यात भावनिक जवळीकतेला किती महत्व द्यावे हे तुमचं तुम्ही ठरवा.
विश्वास आणि आत्मविश्वास दोन्ही महत्वाचे
योग्य बंध निर्माण करण्यासाठी तुमच्या जोडीदाराला हे कळणे महत्त्वाचे आहे की तुम्ही त्यांना समजून घेत आहात त्यांच्यापुढे तुमची गरज दाखवत नाही. आपल्या फिलिग्स शेअर करण्यासाठी योग्य वेळ घ्या. स्पेशली महिलांनी कोणत्याची नात्याची सुरवात करताना घाई करू नका. अनुभवातून काही गोष्टी समजून घ्या भावनिकतेसोबत थोडी प्रॅक्टिकल जोड ठेवा आणि नंतर निर्णय घ्या. कारण महिलांच्या याच गुणाचा फायदा घेणारे लोकंही याच जागात आहेत हे विसरू नका. नातेसंबंधात विश्वास आणि आत्मविश्वास दोन्ही महत्वाचे आहेत, त्यामुळे या गोष्टी बॅलेन्स करण शिका.