Friendship Day 2023 : मैत्रीचे नाते हे दोन व्यक्तींमध्ये असते जे एकमेकांना आपल्या चांगल्या वाईट गुणांसह स्वीकारतात. जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटते, तो खरा वाटतो, त्यांच्या वागण्यात किंवा तुमच्या दोघांमध्ये काही साम्य असते तेव्हा मैत्री सुरू होते. मैत्री कोणाशीही असू शकते. तिथे वय, जात, गरीब-श्रीमंत, मुलगा-मुलगी असा कोणताही आव नसतो. कधी कधी दोन भिन्न लिंगांच्या लोकांमधील मैत्री अधिक घट्ट होते अनेकांना ते मित्र नसून कपल असल्याचे वाटते. हे नातं मैत्रिच्या पलिकडे आणि प्रेमाच्या अलिकडचं असते.
मित्रमैत्रिणीबरोबरच नातं कसं आहे ते ओळखूया
मुलगा आणि मुलगी यांच्यातील मैत्री प्रेमात बदलू शकते. कुछ कुछ होता है या चित्रपटातला शाहरूख खानचा डायलॉग ऐकला असेल. ‘प्यार दोस्ती है’. तुमचमगी नात असचं काही तर नाही ना? काहीवेळा लोक त्यांच्या मित्राची काळजी आणि त्यांचे प्रेम यात फरक करू शकत नाहीत. अशा वेळी मित्र मैत्री निभावतोय की प्रेम करायला लागलाय हे त्यांना कळत नाही. अनेकदा मित्र त्यांच्या भावनांबद्दल अनभिज्ञ राहतात. त्याला हे समजत नाही की त्याला आपल्या मित्राबद्दल असलेली भावना केवळ आकर्षण नाही तर प्रेम आहे. या फ्रेंडशिप डे ला आपण काही संकेतांद्वारे तुमचं तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबरच नातं कसं आहे ते ओळखूया. आपण एखाद्या मित्राच्या प्रेमात पडला आहात की नाही? मैत्रीच्या नात्याचे रूपांतर प्रेमात झाले आहे का? ते या संकेतांवरून समजून घेवूया.
मैत्रिणीकडून तुम्हाला अटेंशन हवे असते
एखाद्या व्यक्तीचे अनेक मित्र असू शकतात, परंतु जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राच्या किंव मैत्रिणीच्या जवळ एखाद्या दुसऱ्याच व्यक्तीला पाहता तेव्हा तुम्हाला त्याचा आपोआप हेवा वाटू लागतो तेव्हा समजून घ्या की तुमच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर होते आहे. उदाहरणार्थ, जर तुमच्या महिला मैत्रिणीसोबत दुसर्या मुलाची मैत्री वाढली तर ते तुम्हाला नाही आवडणार. कारण त्या मैत्रिणीकडून तुम्हाला अटेंशन हवे असते.
गर्दीतही त्याची किंवा तिची आठवण येते
मित्र अनेकदा त्यांच्या ग्रुपमध्ये एकत्र मजा करतात, पण जेव्हा तुम्हाला ग्रुपमधील खास मित्रासोबत एकांतात वेळ घालवावसा वाटतो त्याच्यासोबत सतत बोलाव वाटतं, त्यांच्याबद्दल जाणून घ्याव वाटतं, तेव्हा समजून घ्या की तुम्ही त्या मित्राच्या प्रेमात पडत आहात. अनेक लोकांच्या गर्दीतही, तुम्हाला तुमच्या त्या मित्रासोबत राहायचे आणि फिरायचे असते. त्याच्या किंवा तिच्या एका बघण्याची तुम्ही वाट पाहत असता, तेव्हा समजून जा तुम्ही प्रेमात पडला आहात.
फक्त एकाच व्यक्तीचा विचार डोक्यात पिंगा घालतो
जेव्हा तुमचा एखादा खास मित्र तुमच्या मनात सतत पिंगा घालतो, तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत फक्त त्याचाच विचार करू लागता, अनेकदा त्याचा विनाकराण कॉल करून चुकून कॉल लागला म्हणत तासंतास बोलत बसता, तेव्हा समजू शकता की त्या मित्रा किंवा मैत्रिणीने तुमच्या हृदयात स्वतःसाठी एक खास जागा तयार केली आहे. दुसरीकडे, जर तुमचा तो खास मित्र कोणत्याही ग्रुपमध्ये सहभागी झाला नाही, तर तुम्हाला त्यांची अनुपस्थिती खटकायला लागते आणि तुमचे मनही इतरांसोबत लागत नाही. सतत तो किंवा ती कधी येणार याची वाट बघत असता. आणि अनेकदा डान्समध्ये तिच माझी पार्टनर असावी अशी इच्छाही व्यक्त करता.
तुम्ही बेस्ट फ्रेंडच्या प्रेमात असाल तर काय कराल?
अनेकदा तुम्ही आवडत्या मित्राचा उल्लेख करता. तेव्हा तुम्ही घरात किंवा तुमच्या बेस्ट फ्रेंडकडे त्याचा किंवा तिचा उल्लेख करायला सुरुवात करता. इतर मित्रांसमोर त्यांच्याबद्दल बोलायला आणि मुद्दाम त्या व्यक्तीचा विषय काढायला लागता. तुमच्या बोलण्यात तुमच्या प्रत्येक शब्दात आणि जीवनात त्यांचे महत्त्व वाढू लागते. एवढेच नाही तर सोशल मिडिावर जावून तुम्ही त्याची संपुर्ण माहिती घेवून येता. वारंवार त्याचे किंवा तिचे फोटो बघायला लागता. तेव्हा मित्रमैत्रिणींनो, कधी तुम्हीला आपल्या बेस्ट फ्रेंडबद्दल अशी फिलिंग जाणवली तर वेळीच आपल्या भावना व्यक्त करा. कारण मैत्रिच्या नात्यात आलेली प्रेमाची गोष्ट तुमच्या खऱ्या मैत्रीत ठिणगी पाडू शकते.