How To Apologize Genuinely : कधीकधी नात्यात तणाव निर्माण होतो. त्यामुळे भांडण होण्याची शक्यता जास्त असते. एखाद्या व्यक्तीच्या चुकीमुळे भावनिक वेदना आणि तणाव वाढतो. माफी मागितली तर हा तणाव संपू शकतो. पण माफी कशी आणि केव्हा मागावी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. माफी मागितल्याने आणि माफ केल्याने नातेसंबंधात पडलेली दरी कमी केली जाऊ शकते. पण आपण माफी मागताना आपला अहंकार बाजूला ठेवतो का? माफी कशी मागितली पाहिजे हे जाणून घेणे गरजेचे आहे. (How To Apologize Genuinely in relationship know the tips)
माफी मागणे म्हणजे काय?
माफी मागणे म्हणजे सहानुभूती, पश्चात्ताप तसेच चुकांमधून शिकण्याचे समोरच्याला वचन दणे. आपण काहीतरी चुकीचे केले याचा आधी स्विकार करणे. यामुळे समोरच्या व्यक्तीला झालेल्या भावनिक त्रासाबद्दल तुम्ही गिल्टि फिल करत आहात, तुम्हाला वाईट वाटले आहे आणि तुम्ही तुमची चूक सुधारण्यासाठी माफी मागत आहात हा भाव तुमच्या वागण्या बोलण्यातून दिसणे महत्वाचे आहे.
मनापासून माफी मागण्याची कारणे
जेव्हा तुम्ही चूक केली असेल किंवा एखाद्या व्यक्तीला दुखावले असेल तेव्हा आपण माफी मागतो. माफी मागण्याची अनेक कारणे आहेत ती तुम्ही कोणत्या आणि कशा पद्धतीने मागता हे तुमच्यावर अवलंबून असते.
• तुमची चूक होती हे मान्य करा.
• तुम्ही चूक कशी केली यावर चर्चा करा.
• तुमचा पश्चात्ताप व्यक्त करा.
• तुमच्या चुकांमधून शिका आणि कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी नवीन मार्ग शोधा.
• समोरच्या व्यक्तीशी संवाद साधण्याचा पर्यत्न करा.
प्रामाणिकपणे माफी मागण्यासाठी काय करावे?
मनापासून माफी मागा
माफी मागताना “मला माफ करा” किंवा “I Am Sorry” असे शब्द नेहमी वापरले जाते. पण त्याऐवजी, “माझ चूकलं मला माफ करा” किंवा “जे घडले त्याबद्दल मला वाईट वाटत आहे” यासारखी वाक्ये निवडल्याने अनेकदा समोरच्या व्यक्तीला आपण खरच गिल्टी आहोत याची जाणीव होते. पण माफी मागताना तुमचा प्रामाणिक प्रयत्न तुमच्या वागण्या आणि बोलण्यातून दिसायला हवा. म्हमून तुम्ही जर कोणती चूक केली असेल आणि तुम्हाला त्याबद्दल वाईट वाटत असेल तर मनापासून समोरच्या व्यक्तीची माफी मागा.
जबाबदारी स्वीकारा
नात्यात दोघांची चूक असेल तर माफी का मागायची? बरेच लोक या प्रश्नावरून भांडण करतात. किरकोळ चूक झाली तरी माफी मागण्यात मोठेपणा आहे. जर तुम्ही एक पुढे पाऊल टाकले आणि जबाबदारी स्वीकारली तर तुम्ही स्वतः तणावमुक्त व्हाल. समोरची व्यक्तीही तुमच्या वागण्याने खूश होईल, पण वारंवार तुम्हीच माफी मागत असाल तर थांबा.
काही शब्दांवर जोर द्या
माफी मागताना नेहमी तुमचे शब्द काळजीपूर्वक वापरा. तुमची हतबलता दर्शवणारे शब्द वापरणे टाळा. “जर” किंवा “कदाचित” सारखे शब्द टाळा. यामुळे तुमचा संवाद अस्पष्ट होऊ शकतो. जर तुम्ही स्वत:ला प्रामाणिक व्यक्ती म्हणून प्रेझेंट केले तर समोरच्या व्यक्तीवर तुमची चांगली छाप पडेल. तुमच्या सभ्यतेचा त्यांच्यावर सकारात्मक प्रभाव पडेल.
सकारात्मक संवाद आवश्यक
जर आपण आपल्या संभाषणातून नकारात्मकता पसरवली तर माफी मागण्यात काही अर्थ नाही. नेहमी सकारात्मक संवाद साधण्याचा प्रयत्न करा . तुमच्या बोलण्यात अहंकार किंवा मत्सर दिसून येऊ नये हे लक्षात ठेवा. सकारात्मकतेमुळे वाईट परिस्थिती देखील चांगल्यामध्ये बदलू शकते.
माफीची अपेक्षा करू नका
एखादी चूक झाली तर माफी मागणे आवश्यक आहे. त्यावर प्रामाणिकपणे काम करणेही महत्त्वाचे आहे. पण माफी मिळेलच याची खात्री नाही. विशेषतः गंभीर चूकांमध्ये किंवा एखाद्याचा विश्वास गमावणे, अशा वेळी माफीची अपेक्षा करू नका. ज्या व्यक्तीचे आपल्या वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे मन दुखावले असेल त्यांना थोडा वेळ आणि त्यांची स्पेस देणे आवश्यक असते. त्यांच्यावर दबाव आणू नका. फक्त तुमच्या बाजूने प्रामाणिक प्रयत्न करत रहा.