Shahrukh Khan and Gauri Khan Relationship : शाहरुख खान आणि गौरी खान हे बॉलीवूडच्या स्टार कपलपैकी एक आहेत. बॉलिवूडचे हे स्टार कपल ग्लॅमरस, स्टनिंग आणि बोल्ड आहे. जेव्हा ते एकत्र बाहेर पडतात तेव्हा त्यांच्यातला बॉंड बघून अनेकजन प्रभावीत होतात. लोक नेहमी या कपलबद्दल आणि त्यांच्या दीर्घकाळ टिकणाऱ्या वैवाहिक जीवनातील अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. (Know Secrets of Happy Marriage Life from Gauri and Shah Rukh Khan)
शाहरुख खान बॉलिवूडचा बादशाह आहे तर गौरी खान राणी म्हणून ओळखली जाते यात शंका नाही. गौरी ही केवळ सुपरस्टारची पत्नी नाही तर एक महिला उद्योजिका देखील आहे जिने सेलिब्रेटींची घर सजवली आहे. इंटिरिअर डिझायनर गौरी खान चित्रपटांचे प्रमोशन करत नसली तरी सर्व इंटिरियर डिझायनर ब्रँड्स आणि सेलिब्रिटींसाठी ती नक्कीच लोकप्रिय आहे.
शाहरुख खानच्या कामामुळे त्याला लोकांचे प्रेम मिळते, लोक त्याला किंग खान नावाने ओळखतात. बॉलिवूडच्या जगात त्याला रोमान्स किंग म्हणूनही ओळखले जाते. त्याच्या रोमान्सबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटांमध्ये रोमान्स व्यतिरिक्त तो खऱ्या आयुष्यातही खूप रोमँटिक आहे. शाहरुख आणि गौरी खान यांच्या लग्नाला 25 वर्षांहून अधिक वर्षे झाली आहेत, पण आजही दोघांमधील प्रेम कायम आहे. त्यांच्यातले हे प्रेम कसे टिकून आहे? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आपण किंग खानकडून रोमँटिक रिलेशनसाठी काही टिप्स घेवूया. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या पार्टनरच्या जवळ येऊ शकता आणि तुमची लव्ह लाईफ हॅप्पी करू शकता.
शाहरुखच्या क्वॉलिटिज
ट्विटरवरील ‘आस्क मी एनिथिंग’ या सिझनमध्ये एका चाहत्याने शाहरुखला गौरीला त्याच्याबद्दल सर्वात जास्त काय आवडते असे विचारले होते. यावर अभिनेत्याने उत्तर दिले की, “मी स्वयंपाक करतो, स्वच्छचा करतो आणि मुलांची काळजी घेतो. मला असे वाटते की गौरीला माझ्यातल्या क्वॉलिटिज आवडत असाव्या.” यावरून असे लक्षात येते की शाहरुखसारखा कॉमेडी जोडीदार असावा असे कोणाला वाटणार नाही? नात्यात संवाद करत असताना नेहमी सिरियस असण्याची गरज नाही, कधीकधी एक छोटा विनोद तुमच्या नात्याला फूलवू शकतो.
विश्वास
कोणत्याही नात्याची ताकद ही दोघांमधील विश्वासावर अवलंबून असते. तुमचा तुमच्या जोडीदारावर जितका विश्वास असेल तितके तुमचे नाते अधिक मजबूत होईल. शाहरुख आणि गौरी खान यांच्या नात्यात असे अनेक चढ-उतार आले आहेत, पण दोघांमध्ये नेहमीच विश्वास टिकून राहिला आहे, जो त्यांच्या नात्याला दिर्घायुषी करण्याचे आणि प्रेम वाढवण्याचे काम करतो.
नेहमी एकत्र रहा
आपल्या जोडीदाराने नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहावे, आपल्यावर प्रेम करावे, ही सर्व कपलची इच्छा असते. गौरी आणि शाहरुखने ही गोष्ट नेहमी गाठीशी ठेवली. दोघेही चांगल्या-वाईट काळात एकत्र उभे राहिले, यामुळे त्यांचा एकमेकांबद्दलचा आदर आणि प्रेम कधीच कमी झाले नाही. प्रत्येक संकटाच्या काळात गौरी आणि शाहरूखने एकमेकांना सपोर्ट केला म्हणून आज त्यांचे नाते टिकून आहे. नाही बॉलीवूडमध्ये नात्यांची कशी ताटातूट होते हे आपण बघत आहोत.
एकमेकांचा आदर करा
कोणत्याही नात्यासाठी तुमच्या जोडीदाराचा आदर सर्वात महत्त्वाचा असतो. जर तुम्ही आदर केला तर प्रेम कधीच कमी पडणार नाही. जर तुम्ही आदर केला नाही तर तुमचा पार्टनर देखील तुमचा आदर करणार नाही आणि दोघांमध्ये वाद वाढेल, म्हणून गौरी आणि शाहरुख प्रमाणेच तुम्ही देखील एकमेकांचा आदर करा आणि तुमच्यातील अंतर दूर करा.
जोडीदाराला वेळ द्या
शाहरुख हा खूप मोठा सुपरस्टार आहे, इतका व्यस्त असूनही तो नेहमी आपल्या पत्नी आणि कुटुंबासाठी वेळ काढतो. त्याला त्याच्या क्वालिटी टाइमची चांगलीच जाणीव आहे. म्हणून तुम्ही तुमच्या जोडीदाराला दर्जेदार वेळ द्यावा. घर असो, कुटुंब असो किंवा ऑफिस असो सर्वांपासून थोडा मोकळा वेळ काढून जोडीदारासोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करा.
योग्य निर्णय घ्या
नातेसंबंधात परस्पर सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे. तुम्हीही किंग खान आणि गौरीप्रमाणे परस्पर सल्ल्याने निर्णय घ्या . चुकीच्या निर्णयाचा तुमच्या नात्यावर परिणाम होतो. तुम्ही देखील नात्यात असाल तर तुमच्या जोडीदाराच्या मतांचा विचार करून निर्णय घ्यावा. यामुळे तुमच्या जीवनात एकमेकांचे महत्व आहे याची जाणीव होईल.