Smoking effect on sexual health : धूम्रपान शरीराला हानिकारक असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. धूम्रपानामुळे तुमचे ओठ, फुफ्फुस आणि तोंडाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. काही लोक त्यांचे स्टाईल स्टेटमेंट किंवा फॅशन म्हणून धूम्रपान करतात. पण हेच धूम्रपानाचे व्यसन त्यांचे लैंगिक जीवनही उद्ध्वस्त करू शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला धुम्रपानाचे तोटे नाही तर धूम्रपान सोडण्याचे फायदे सांगणार आहोत. (Quitting smoking can be beneficial for your sex life)
धूम्रपान सोडल्यानंतर काही दिवसांतच तुम्हाला त्वचा, फुफ्फुस, हृदयाच्या आरोग्यामध्ये सुधारणा दिसू लागते. यासोबतच तुम्हाला तुमच्या प्रजनन प्रक्रिया आणि लैंगिक आरोग्यामध्येही सकारात्मक बदल दिसून येतील. कदाचित धूम्रपान करत असताना तुम्ही तुमच्या लैंगिक जीवनाचा जितका आनंद घेत नसाल तितका धूम्रपान सोडल्यानंतर तुम्ही करू शकता. आता धूम्रपान सोडणे आपल्या लैंगिक जीवनासाठी कसे फायदेशीर ठरू शकते ते जाणून घेवूया.
धूम्रपानामुळे स्त्री आणि पुरुष दोघांच्याही लैंगिक आरोग्यावर परिणाम होतो.
धूम्रपानाच्या व्यसनामुळे फ्री रॅडिकल्स तयार होतात, ज्यामुळे पुरुषांच्या शुक्राणूंमध्ये ऑक्सिडेटिव्ह नुकसान दिसून येते. अशा परिस्थितीत शुक्राणूंच्या संख्येवर नकारात्मक परिणाम होतो. चेन स्मोकिंग करणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या शून्य असण्याचा धोकाही असतो. याशिवाय पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या दिसून येते. पुरुषांचे लिंग पूर्णपणे ताठ होत नाही आणि लैंगिक इच्छा देखील कमी होते. यामागचे कारण धूम्रपान असू शकते. यामुळे रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूंचे नुकसान होते. यामुळे योनीमार्गात कोरडेपणा आणि स्त्रियांमध्ये वेदनादायक संभोग होतो. एवढेच नाही तर महिलांची कामवासनाही कमी होत आहे. तसेच, जर एखाद्या महिलेने चेन स्मोकिंग केले तर तिला वंध्यत्वाचा धोका देखील वाढतो.
धूम्रपान सोडल्याने तुमचे लैंगिक जीवन कसे सुधारू शकते?
कामवासना वाढू लागते :
धूम्रपान सोडल्याने तुमची तणाव पातळी लक्षणीयरीत्या कमी होते आणि तुमच्या हार्मोन्सची पातळी नॉर्मल होण्यास मदत होते, ज्यामुळे तुमच्या लैंगिक जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात. तुमची आणि तुमच्या जोडीदाराची कामवासना वाढते, म्हणजे लैंगिक इच्छा, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लैंगिक क्रियांचा अधिक आनंद घेऊ शकता.
रक्ताभिसरण चांगले होते :
सिगारेटमधील निकोटीनमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तप्रवाहावर परिणाम होतो. धूम्रपान सोडण्याचा एक उत्तम फायदा म्हणजे तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. या स्थितीत शरीरात सर्वत्र ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात पोहोचतो. निरोगी रक्ताभिसरण हॅप्पी हार्मोन्सला प्रोत्साहन देते.
उत्तम लैंगिक कामगिरी :
धूम्रपान करणारा पार्टनर अनेकदा त्यांच्या बेडरूममध्ये लैंगिक क्रिया करत असताना लवकर थकतात. मग तो पुरुष असो वा स्त्री. तुम्ही धूम्रपान सोडताच तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, ज्याला आपण निरोगी रक्ताभिसरण म्हणतो. पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन आपल्या शरीरात पोहोचतो ज्यामुळे सहनशक्ती आणि ऊर्जा दोन्ही वाढतात आणि आपण दीर्घकाळ आपल्या लैंगिक क्रियाकलापांचा आनंद घेऊ शकता. धूम्रपान सोडल्यानंतर तुमचे लैंगिक जीवन सुधारण्यासाठी तुम्ही पूर्ण उर्जेने सेक्स गेम्स, योगासने इत्यादींचा आनंद घेऊ शकाल. त्यामुळे आजच धूम्रपान सोडा आणि तुमच्या जोडीदारालाही धूम्रपान सोडण्यासाठी प्रोत्साहित करा.
पुरुषांचे लैंगिक आरोग्य सुधारते :
तुमच्या जोडीदाराने सिगारेट सोडताच त्यांचे लैंगिक आरोग्य सुधारते. सिगारेटमध्ये असलेल्या निकोटीनमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात त्यामुळे पुरेशा प्रमाणात रक्त लिंगापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन होते. धूम्रपान सोडल्याने तुमचे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीरात पुरेसा ऑक्सिजन आणि रक्त पोहोचते, त्यामुळे इरेक्शन होण्यास मदत होते.