Relationship Tips : सावत्र आई होणे सोपे काम नाही. समाजात जेव्हा-जेव्हा या नात्याचा उल्लेख झाला तेव्हा लोकांच्या मनात स्त्रीबद्दलची नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली. अर्थात सावत्र आईला मुलांच्या मनात तिचं स्थान निर्माण करणं खूप अवघड असतं, पण काही छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर वर्षानुवर्षे तडे गेलेल्या या नात्याला एक नवा पैलू देता येतो. म्हणून आज आपण रत्ना पाठक आणि सुप्रिया पाठक यांनी लग्नानंतर सावत्र आईची भूमिका कशी पार पाडली आणि आपल्या मुलांसोबत कसा बॉंड तयार केला हे जाणून घेवूया. (Ratna Pathak and Supriya Pathak give special parenting tips to Step Mothers)
रत्ना पाठक आणि तिची बहीण सुप्रिया पाठक हे दोघेही ज्येष्ठ अभिनेत्री दिना पाठक यांच्या मुली आहेत. ज्या बहिणींचे लग्न फिल्मी कुटुंबात झाले आहे आणि त्यांची स्वतःची अभिनय कारकीर्द आहे त्यांनी अलीकडेच ट्विंकल खन्नाच्या शोमध्ये हजेरी लावली होती जिथे त्यांनी त्यांच्या बालपणीच्या दिवसांच्या आठवणी शेअर केल्या. रत्ना सुप्रियापेक्षा वयाने मोठ्या आहेत आणि त्यांच्या वयात चार वर्षांचे अंतर आहे.
रत्ना पाठक शहा आणि सुप्रिया पाठक यांनी अलीकडेच त्यांच्या पालकत्वाच्या शैलीबद्दल सांगितले, ज्यामध्ये त्यांनी आमच्याकडे एक व्यक्ती म्हणून पहा अशी विनंती प्रेक्षकांना केली. या बहिणी ट्विंकल खन्नाच्या द आयकॉन्स शोमध्ये बोलत होत्या ज्या दरम्यान या दोन्ही बहिणींनी आधीच वडील असलेल्या पुरुषांशी लग्न केल्यानंतर त्यासोबत येणारी नाती कशी स्विकारली नात्यातला बॅलेन्स कसा क्रियेट केला याबद्दल सांगितले.
रत्ना पाठक यांचे लग्न नसीरुद्दीन शाह यांच्याशी झाले. नसीरुद्दीन शाह यांचे पहिले लग्न परवीन मुरादशी लग्न झाले होते, ज्यांना हिबा शाह ही मुलगी आहे. त्याचप्रमाणे, पंकज कपूरचे पहिले लग्न नेलिमा अझीमशी झाले होते, ज्यांच्यापासून त्यांना एक मुलगा होता म्हणजे प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर.
रत्नाने शेअर केले की अभिनेता-पती नसीरुद्दीन यांचा सल्ला एक सुवर्ण नियम आहे ज्याचे पालन करण्याचा ती प्रयत्न करते. नसीरुद्दीन यांनी तिला सांगितले होते की “नात्याला जास्त नाव न ठेवणे चांगले.” हिबासोबत नातं तयार करताना नसीरुद्दीन यांचा हा सल्ला लक्षात ठेवला. पती, पत्नी, आई, मुलगा या गोष्टींचा टॅग न लावता जर तुम्ही नाते थोडे लवचिक ठेवले तर त्याचा फायदा होतो, असे रत्ना पाठक म्हणाल्या.
“हीबाला आणि मला नसीरुद्दीन याच्या सल्ल्याची नक्कीच मदत झाली. आम्ही दोघीही आमचं नातं लवचिक ठेवू शकलो. याचे सर्व श्रेय मी हिबाला देते कारण ती तरुण होती, तिला नवीन जगात काही नवीन गोष्टींचा स्विकार करावा लागला. आम्ही फक्त प्रयत्न करण्याचे ठरवले आणि आमचं नातं दोन्ही बाजूंनी कधी पुढे गेलं ते आम्हालाही कळलं नाही सुदैवाने आमच्या दोघीतला बॉंड विकसित झाला.” असं रत्ना पाठक यांनी सांगितलं.
शाहिद अवघ्या सहा वर्षांचा असताना पहिल्यांदा भेटल्याचा उल्लेखही सुप्रियाने केला. “मी शाहिदला भेटले तेव्हा तो अवघ्या 6 वर्षांचा होता. माझ्यासाठी तो मी पाहिलेला सर्वात गोंडस मुलगा होता. तो खूप गोड मुलगा होता, मला त्याच्याबद्दल कधीही वैर वाटले नाही. अगदी सुरुवातीपासूनच आम्ही एकमेकांना पसंत केले. त्याने कधी मला उद्धटपणे प्रतिक्रिया दिली नाही आणि मीही त्याच्याशी कधी उर्मट वागले नाही. म्हणून आमच्यातला बॉंड वाढत गेला. जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा एक माणूस म्हणून एकमेकांना स्विकारलं आणि आमचं नातं पुढे नेलं.
प्रेमाने मुलांची मने जिंका
मुलं खूप हळव्या मनाची असतात. जी व्यक्ती त्यांना प्रेमाने समजावते त्यांनाच ते जवळ करतात. अशा वेळी सुरुवातीला, शक्य तितके, मुलाला प्रेमाने समजावून सांगा. मूल दत्तक घेतलेले असो किंवा तुम्ही विवाहित व्यक्तीशी लग्न केले असेल तर सुरुवातीला मुलाला समजावण्याची जबाबदारी वडिलांवर सोपवा. वडिलांनी त्याला रागावले तर तुम्ही मुलांना प्रेमाने समजावून सांगा, असे केल्याने मूल तुमच्या जवळ येऊ लागेल.
मुलांना त्यांची स्पेस द्या
काही स्त्रिया मुलासोबत अधिकाधिक वेळ घालवण्यासाठी घाई करतात. कधीकधी मुलांना फक्त त्यांच्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवायचा असतो. मुलाचे मित्र व्हा, पण त्याच्या प्रत्येक कामात ढवळाढवळ करणं टाळा. त्यापेक्षा मुलाशी असं नातं तयार करा की मुल स्वतः तुमच्याशिवाय क्षणभरही राहू शकणार नाही.
त्यांच्यासोबत खेळा
मुलाच्या जवळ जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे खेळणे. तुम्ही तुमच्या मुलासोबत जितके जास्त खेळाल तितकेच तो तुम्हाला मित्रासारखा वाटेल. संध्याकाळी मुलासोबत उद्यानात जाण्यासाठी वेळ काढा. जर मुलाला वडिलांसोबत एकटे जायचे असेल तर त्याला जाऊ द्या. मुलाला त्याच्या नवीन आईच्या चांगल्या सवयींबद्दल सांगणे हे वडिलांचे देखील कर्तव्य आहे.