Independence Day Trip Plan : स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अनेक लोक सुट्टीच्या निमित्ताने कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करतात. अनेक जण शहराबाहेर जाण्याचाही बेत आखतात. यंदा 15 ऑगस्टला दोन सुट्ट्या लागून आल्याने तुम्हीही कुठेतरी जायचा प्लॅन केला असेल? पण जर तुम्ही या सुट्ट्यामध्ये कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर काही ठिकाणी जाणे टाळलेलेच बरे. कारण 15 ऑगस्ट काही पर्यटन ठिकाणी खूप गर्दी असते. यामुळे तुमची सुट्टी खराब होऊ शकते. तुम्हाला तुमचा वीकेंड शांत वातावरणात एन्जॉय करायचा असेल, तर या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करू नका. (Avoid visiting this place on occasion of 15 august independence day)

नैनिताल (Nainital) : या वीकेंडला नैनितालमधील प्रेमात पाडणाऱ्या वातावरणाचा आणि दऱ्या-खोऱ्यांचा आनंद घ्यायला कोणाला आवडत नाही? पण 15 ऑगस्टच्या आसपास तुमचा हा प्लॅन बनवू नका. दिल्ली आणि त्याच्या लगतच्या शहरांमधून मोठ्या संख्येने लोक नैनितालला भेट देण्यासाठी येतात. त्यामुळे ज्या नैनितालला तुम्ही शांततेच्या शोधात जाल, तिथे तुम्हाला या दिवसांमध्ये प्रचंड गर्दीचा सामना करावा लागू शकतो.

इंडिया गेट (India Gate) : दिल्लीच्या ऐतिहासिक वास्तू आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये इंडिया गेटचाही समावेश आहे. इथे वर्षभर मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. पण 15 ऑगस्टला इथे जाण्याचा प्लॅन रद्द केला तर तुमच्यासाठी बरं होईल. याचे कारण इंडिया गेटजवळ असलेले राष्ट्रीय युद्ध स्मारक पाहण्यासाठी लोक लांबून येतात. त्यामुळे येथे चालायलाही जागा मिळणे कठीण होते.

अटारी-वाघा बॉर्डर (Attari-Wagah border) : सुट्ट्यांमध्ये अमृतसरमधील अटारी-वाघा बॉर्डरवर जाण्याचाही अनेकांचा बेत असतो. मात्र 15 ऑगस्टला इथे एवढी गर्दी असते की पाय ठेवणंही अवघड होऊन बसतं. भारत-पाकिस्तान सीमेवर या प्रसंगी परेड होते. जे पाहण्यासाठी हजारो लोक इथे पोहोचतात. त्यामुळे येथे एवढी गर्दी होते की, आरामात चालणेही कठीण होते.

बनारस घाट (Ghats of Benares): बनारसच्या घाट आणि इथली गंगा आरती खूप प्रसिद्ध आहे. या नयनरम्य दृश्यांचा आनंद घेण्यासाठी दूरदूरवरून लोक येतात. विशेषत: जे परदेशी पर्यटक स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्या देशात येतात, ते बनारसची गंगा आरती पाहायलाही येतात आणि ही आरती पाहण्यासाठी अनेक वेळा गर्दी जमते. त्यामुळे या दिवशी वाराणसीला जाणे टाळायला हवे.

ताजमहाल (Taj Mahal): 15 ऑगस्टचे कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक दिल्लीत येतात. हे कार्यक्रम सकाळी लवकर संपतात. त्यानंतर आग्रा शहर जवळ असल्यामुळे, अनेक वेळा लोक ताजमहालला भेट देण्याचा विचार करतात. त्यामुळे आग्रा शहरात मोठी गर्दी पाहायला मिळते. ताजमहाल पाहण्याबरोबरच बहुतेक लोक फतेहपूर सिक्री, आग्रा किल्ल्याला भेट देतात आणि या ठिकाणी मोठी गर्दी असते.