Road Trips in India : भारतातील जवळपास प्रत्येक शहर रस्त्यांनी एकमेकांशी जोडले गेले आहे. केवळ सपाट भागातील ठिकाणेच नाही तर डोंगराळ ठिकाणेही एमेकांना रस्त्याच्या माध्यमांनी जोडलेली आहेत. कदाचित त्यामुळेच आजच्या काळात भारतातील मित्रांसोबत रोड ट्रिपला जाणे ही एक वेगळीच मजा आहे. भारतातील काही रस्ते धोक्याचे, साहसी आणि नैसर्गिक सौंदर्याने भरलेले आहेत, जिथे बाइकर्स आणि पर्यटक अनेकदा या रोमांचक रोड ट्रिपला जातात. आज आम्ही तुम्हाला भारतातील 9 सर्वोत्तम रोड ट्रिप ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही आपल्या मित्रांसोबत जावू शकता. (Explore these 9 road trips in India because Zindagi Na Milegi Dobara)
दिल्ली ते मनाली (Delhi to Manali)
दिल्ली ते मनाली आणि नंतर मनाली ते लेह हा रोड ट्रिप बाइकर्समध्ये खूप प्रसिद्ध आहे. सुंदर लँडस्केप आणि साहसांनी भरलेली ही ट्रिप भारतातील सर्वोत्तम रोड ट्रिपपैकी एक आहे. दिल्ली ते लेह हे अंतर सुमारे 1020 किलोमीटर आहे आणि यादरम्यान तुम्हाला NH 1 आणि NH 21 मधून जावे लागते. दिल्ली ते लेह रोड ट्रिपला सुमारे 25 तास लागू शकतात.
दिल्ली ते आग्रा आणि जयपूर (Delhi to Agra and Jaipur)
दिल्ली ते आग्रा आणि आग्रा ते जयपूर ही भारतातील सर्वोत्तम रोड ट्रिप आहे. या दोन्ही ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध शहरांमध्ये रोड ट्रिपद्वारे पोहोचणे हा एका रोमांचक अनुभव असेल. या सहलीत तुम्ही फक्त बाइकनेच नाही तर कारनेही जाऊ शकता. राष्ट्रीय महामार्ग NH 93 आणि NH 8 मार्गे दिल्ली ते आग्रा आणि आग्रा ते जयपूर दरम्यानचे अंतर सुमारे 450 किमी आहे.
दिल्ली ते स्पिती व्हॅली (Delhi to Spiti Valley)
दिल्ली ते स्पिती व्हॅली ही भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वोत्तम रोड ट्रिप आहे. ही रोड ट्रिप तुम्हाला साहसी अनुभव देईल. जेथे लाखो बाईकर्स दरवर्षी फिरण्यासाठी बाहेर पडतात. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की दिल्ली ते स्पिती व्हॅली दरम्यानचे अंतर सुमारे 730 किलोमीटर आहे. या प्रवासादरम्यान तुम्हाला एक उत्तम लँडस्केप पाहता येईल.
चंदीगड ते कसोल (Chandigarh to Kasol)
हिमाचल प्रदेशातील कासोल हे एक अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, जे धडसी क्रियांसाठीही प्रसिद्ध आहे. चंदीगड ते कसोल हे निसर्गाच्या विहंगम अशा सुंदर दृश्यांनी परिपूर्ण आहे. म्हणून ते बाइकर्समध्ये देखील खूप प्रसिद्ध आहे. चंदीगड ते कसोल हे अंतर अंदाजे 273 किलोमीटर आहे. कारने रोड ट्रिपचा आनंद घेताना तुम्ही कुटुंबासह देखील जाऊ शकता.
अहमदाबाद ते रन ऑफ कच्छ (Ahmedabad to Run of Kutch)
वाळवंटातून आणि स्थानिक गावांमधून रन ऑफ कच्छला जाण्याची एक वेगळीच मजा आहे. अहमदाबाद ते कच्छ हा रस्ता भारतातील सर्वोत्तम रोड ट्रिपपैकी एक असल्याचे म्हटले जाते. अहमदाबाद ते रन ऑफ कच्छ रोड ट्रिपसाठी सर्वोत्तम वेळ ऑक्टोबर ते मार्च दरम्यान आहे. ही रोड ट्रिप सुमारे 454 किमी आहे.
शिलाँग ते चेरापुंजी (Shillong to Cherrapunji)
जर तुम्हाला ईशान्येकडील रोड ट्रिपला जायचे असेल तर तुम्ही शिलाँग ते चेरापुंजी रोड ट्रिपला जाऊ शकता. मनमोहक नैसर्गिक सौंदर्याने भरलेली ही रोड ट्रिप तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही विसरणार नाही. या ट्रिपमध्ये तुम्ही मान्सून, डोक्याला लागणारे ढग, पर्वत आणि धबधब्यांचा आनंद घेऊ शकता. निसर्गाचा पुरेपुर आनंद घेण्यासाठी ही रोडट्रिप बेस्ट निवड असेल. शिलाँग ते चेरापुंजी अंतर 54 किलोमिटर आहे.
हैदराबाद ते हम्पी (Hyderabad to Hampi)
हैदराबाद ते हम्पी ही दक्षिण भारतातील सर्वात लोकप्रिय रोड ट्रिप आहे. हंपी हे असे ठिकाण आहे जिथे तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत कधीही रोड ट्रिपला जाऊ शकता. हैदराबाद ते हम्पी हे अंतर अंदाजे 385 किलोमीटर आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की हम्पीला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यानचा काळ सर्वात चांगला मानला जातो.
जयपूर ते जैसलमेर (Jaipur to Jaisalmer)
राजस्थानी सौंदर्याचा साक्षीदार होण्यासाठी जयपूर ते जैसलमेर रोड ट्रिप बेस्ट पर्याय आहे. वाळवंट आणि पर्वतांमधून गेल्यावर तुम्हाला खूप आनंददायी अनुभव मिळू शकतो. प्रवासादरम्यान तुम्ही सर्वोत्तम स्थानिक खाद्यपदार्थांचाही आनंद घेवू शकता. जयपूर ते जैसलमेर हे अंतर सुमारे 555 किलोमीटर आहे आणि यास सुमारे 9-10 तास लागू शकतात.
कोलकाता ते दीघा (Kolkata to Digha)
बंगालमधील दिघा हे एक अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे. समुद्र किनाऱ्यावर असल्याने अनेकजण दुचाकी किंवा कारने येथे फिरायला जातात. तुम्हाला जर रोड ट्रिपचा आनंद घ्यायचा असेल त्याचबरोबर कोस्टर राईड एंजॉय करायची असेल तर तुम्ही या प्रवासाचा आनंद घ्यावा. कोलकाता ते दिघा हे अंतर अंदाजे 183 किलोमीटर आहे.