Trekking Climbing Tips : पर्वतारोहण किंवा गिर्यारोहण ही एक साहसी क्रिया आहे जी साहसी प्रेमींच्या यादीत निश्चितपणे समाविष्ट असते. इतकेच नाही तर गिर्यारोहण मजा मस्ती करण्यासोबतच ते तुम्हाला फिटही ठेवते. भारतात असे अनेक पर्वत आहेत ज्यावर चढणे अवघडच नाही तर धोकादायकही आहे. पण तरीही इथपर्यंत पोहोचणाऱ्या गिर्यारोहकांची कमी नाही. त्यामुळे तुम्हालाही गिर्यारोहणाचा भाग व्हायचे असेल, तर त्यासाठी स्वत:ला तयार करा, तरच तुम्ही या साहसाचा खऱ्या अर्थाने आनंद घेऊ शकाल. (Important tips of mountaineering and climbing in Marathi)
दरम्यान पावसाळा सुरू आहे आणि अनेकांना पर्वत चढायला आणि फोटोग्राफी करायला आवडते. अशातच सैराट फेम परशा म्हणजे आकाश ठोसरने गिर्यारोहणासंदर्भातील एक व्हिडिओ आणि काही टिप्स शेअर केल्या आहेत. तुम्हालाही या टिप्स कोणत्या ते जाणून घ्यायचे असेल तर आपण परशा काय म्हणतोय हे आणि जाणून घेवूया.
“गिर्यारोहण हे साहसी क्षेत्र आहे.एखाद्या डोंगर सुळक्यावर Trekking, Climbing किंवा Rappelling करायची असेल तर, सर्वप्रथम एखादा Rope, Harness आणि safety equipment या साऱ्याची व्यवस्था करुन एखाद्या प्रोफेशनल टीम च्या निगराणी खाली Climbing किंवा Rappelling कराव. सदर व्हिडिओ हा सगळ्या सेफ्टीचा उपयोग करून एका प्रोफेशनल टीम च्या निगराणी खाली बनवण्यात आला आहे. कोणत्याही धोकादायक वातावरणात प्रवेश करण्यापूर्वी नेहमीच व्यावसायिक सल्ला घ्यावा.” असे आकाशने आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. आता आपण पर्वतारोहण करताना काय खबरदारी घ्यावी ते जाणून घेवूया.
https://www.instagram.com/reel/CvCO1xTKOPX/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
पर्वतारोहण प्रशिक्षण
पर्वत चढण्यासाठी, त्यांच्याबद्दल जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, ज्यासाठी लोक पर्वतारोहण कोर्स करतात. कोर्समध्ये तुम्हाला माउंटन क्लाइंबिंग, मॅप फॉलोविंग, रोप वर्क आणि पर्वतीय हवामान याबद्दल संपूर्ण माहिती दिली जाते. ज्याचे काळजीपूर्वक पालन केले पाहिजे अन्यथा तुमच्या जीवाला धोका असू शकते. म्हणूनच चांगल्या संस्थेतून हा कोर्स करणे केव्हाही चांगले.
https://www.instagram.com/reel/Cu_4clUKOBn/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
तयारी आणि नियोजन
पर्वतावर यशस्वी चढाई करण्यासोबतच, तुम्ही पूर्ण नियोजन करून जाल तेव्हाच तुम्हाला प्रत्येक क्षणाचा आनंद घेता येईल. मग ते शॉर्ट क्लाइंबिंग असो किंवा लॉंग क्लाइंबिंग. यासाठी स्वत:ला शारीरिक, मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवणे आणि नियोजन करणे गरजेचे आहे. म्हणजे गिर्यारोहणाच्या कोर्सचा सतत सराव करत राहणे आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही योग्य वेळी कोर्समध्ये सहभागी होऊ शकाल.
व्यायामासाठी योग्य फुटवेयर्स
गिर्यारोहणाच्या ओघात साहस आणि मजा करणे तरूण पसंत करतात, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणार. गिर्यारोहण करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे फुटवेयर्स. होय, पर्वत चढण्यासाठी एखादे फॅशनेबल आणि आरामदायक फुटवेयर्स चालणार नाही. यासाठी तुम्हाला चांगल्या क्वॉलिटिचे आणि कंफर्टेबल शूज घालावे लागतील. जर तुम्ही उन्हाळ्यात पर्वतारोहणाची योजना आखत असाल स्टिफ बूट, हिवाळ्यासाठी क्रॅंपन रेटेड बूट खरेदी करा. संपूर्ण माहिती घेवूनच हे बूट खरेदी करा.
अचूक हवामानाची माहिती
गिर्यारोहणासाठी निघण्यापूर्वी तेथील स्थानिक लोकांची स्थिती जाणून घ्या. डोंगरावरील हवामान मिनिटाला बदलते. जे काही वेळा धोकादायकही ठरू शकते. यासह, प्रशिक्षणादरम्यान धोकादायक हवामानात स्वतःचे संरक्षण कसे करावे हे जाणून घ्या आणि समजून घ्या.
खाणे आणि पिणे
पर्वतारोहणासाठी आपल्यासोबत खाण्यासाठी तयार पदार्थ असणे खूप महत्वाचे आहे. असे केल्याने स्वयंपाकाचे टेन्शन नसते, जेव्हाही भूक लागते तेव्हा आरामात जेवता येते. हे अन्न पौष्टिक आणि उर्जेने परिपूर्ण असण्याव्यतिरिक्त हलके देखील असले पाहिजे कारण पर्वत चढताना तुम्हाला स्वतःची बॅग सोबत घ्यावी लागते. अशा प्रवासात तुम्ही एनर्जी बार आणि पॅक केलेले खाद्यपदार्थ सोबत नेल्यास उत्तम.
आपत्कालीन निवारा
पर्वतावर चढत असताना कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये म्हणून आपत्कालीन निवारा सोबत ठेवा. यामध्ये दोन लोकांपासून ते 10-12 लोक एकत्र राहू शकतात आणि ते मुख्यतः आवश्यक आहेत.
प्रथमोपचार किट
इतर गोष्टींप्रमाणे प्रथमोपचार किटही तितकेच महत्त्वाचे आहे. पर्वतांच्या बदलत्या हवामानामुळे आजारी पडणे अत्यंत स्वाभीविक आहे. अशा वेळी ही औषधे उच्च ताप आणि डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी प्रभावी ठरतात.