Monsoon Visiting Place in India : महाराष्ट्रात पावसाळ्यात फिरण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील घाटमाथा, डोंगर, किल्ले, तर कोकणातील समुद्र किनारे पर्यटकांना आकर्षित करतात. तर देशातही अशी काही निवडक ठिकाण आहेत जिथं पावसाळ्यात जायला हवं. अशी अनेक ठिकाण असतात जी आपल्या बकेटलिस्टमध्ये असतात. त्यामुळे या पावसाळ्यात तुमची देखील बकेटलिस्ट ओपन करा आणि लाईफ एक्सप्लोर करायाची असेल तर पावसाळ्यात देशातील या ठिकाणांना भेट द्या. (visit these places in India during monsoon to explore your life)
कुर्ग : कर्नाटकातील कुर्ग शहर अनेकांना माहित असेल. पावसाळ्यात या शहराचं रुप डोळ्याचं पारणं फेडणारं असतं. कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यात वसलेलं देशभरातील एका सुप्रसिद्ध हिल स्टेशनपैकी एक कुर्ग आहे. दाट आणि गर्द हिरवळ, उंच पर्वत रांगा यामुळे हे ठिकाण भारताचे स्कॉटलंड म्हणूनही ओळखले जाते. पावसाळ्यात हे शहर हिरवेगार नंदनवन दिसते. इथे गेलात तर एबी फॉल्स, नामड्रोलिंग मठ, इरुप्पू वॉटर फॉल्स, होन्नमना केर तलाव, मदिकेरी किल्ला या ठिकाणांना अवश्य भेट द्या.
मुन्नार : पावसाळ्यात दक्षिण भारताचं सौंदर्य काही वेगळंच दिसतं. यात मुन्नार शहराचा नंबर पहिला येतो. केरळमध्ये उंच पर्वत आणि खोल दऱ्या यात वसलेलं मुन्नार आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. इथले चहाचे मळे, बागा, दूरवर पसरलेले तलाव तुमच्या मान्सून विकेंडला खास बनवतील. इथे तुम्ही हाऊसबोटचाही आनंद घेऊ शकता. पुण्या-मुंबईपासून दूर जात तुम्ही शांततेचे ठिकाण शोधत असाल तर मुन्नार तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे.
गोवा : सामान्यतः पर्यटक उन्हाळ्याच्या शेवटी किंवा हिवाळ्यात गोव्याला जायला प्राधान्य देतात. पण आम्ही आवर्जून सांगतो की एकदा पावसाळ्यातही गोव्याला भेट द्यायला हवी. कारण गोव्याचा पाऊस देखील खूप रोमँटिक आणि अनोखा असतो. त्यामुळे एखादा लाँग वीकेंडमध्ये तुम्ही इथे भेट देण्याचा प्लॅन बनवू शकता. इथे तुम्ही दिवसभ बीचवर मजा करू शकता, संध्याकाळी सनसेट पाहू शकता आणि रात्री पब, कसिनोमध्ये नाईट लाइफचा आनंदही घेऊ शकता.
माउंट अबू : माउंट अबू हे राजस्थानमधील एकमेव असे हिल स्टेशन आहे, जे तिथल्या हिरव्यागार परिसरासाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. हे हिल स्टेशन केवळ राजस्थानमध्येच नाही तर भारतातील आणि परदेशातील पर्यटकांचे सर्वात आवडते पर्यटन स्थळ आहे. अरवली पर्वतरांगेतील उंच खडकाळ पठारावर वसलेले माउंट अबू हे जंगलांनी वेढलेले आहे. त्यामुळे या ठिकाणचे थंड हवामान आणि दाट जंगलाचे नजारे पर्यटकांना प्रेमात पाडतात. इथे तुम्ही दिलवाडा मंदिर, नक्की तलाव, चाचा संग्रहालय, अचलगढ किल्ला, टॉड रॉक अशा ठिकाणी भेटी देऊ शकता. येथील सूर्यास्त आणि सूर्योदय पर्यटकांना खूप आकर्षित करतात. इथला पाऊसही खूप खास असतो.
वायनाड: ऑक्टोबर ते मे हे 8 महिने वायनाडला भेट देण्यासाठीचा सर्वोत्तम काळ मानला जातो, परंतु तुम्ही हिरव्यागार निसर्गाचे आणि भरपूर पावसाच्या प्रेमात असाल तर तुम्ही जुलै-ऑगस्टमध्येही वायनाडला नक्की भेट द्या. येथे तुम्हाला डोळे दिपवणारे नजारे आणि निसर्गाचे वेगवेगळे अविष्कार पाहायला मिळतील. येथील नीलिमाला व्ह्यू पॉइंट, चेंब्रा शिखर तुम्हाला केरळच्या प्रेमात पाडतील.याशिवाय ट्री हाऊस, वाथिरी, कुरुवा बेट, थिरुनेल्ली मंदिर यांसारखी प्रसिद्ध ठिकाणेही तुम्ही येथे पाहू शकता.