हरितालिका पूजेसाठी वापरण्यात येणाऱ्या वनस्पतीचे आरोग्यदायी फायदे

तुळशीची पाने

तुळशीच्या पानांचा रस हा सर्दी-कफ-तापावरचे प्रभावी औषध आहे.

आघाडा

आघाड्याचे बरेचसे गुणधर्म स्त्रियांना विशेष उपयुक्त आहेत. आगाडा कफनाशक आहे.

दूर्वा

उष्णतेचे दाह शमन करणारी एक वनस्पती म्हणजे दूर्वा.

शंखपुष्पी

बुद्धि-स्मृतिवर्धक म्हणून सुप्रसिद्ध असणारी ही शंखपुष्पी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करते.

धोत्र्याची पाने

हे श्वसनविकारावरील प्रभावी औषध आहे. धोतरा विषारी असल्यामुळे तो योग्य मात्रेतच प्राशन करावा अन्यथा शरीरास त्रास होऊ शकतो.

मधुमालती

ही पत्री प्रामुख्याने विविध मुखरोगांवर उपयुक्त वनस्पती आहे.

बेलाची पाने

बेल हे आतड्यांच्या आजारांवर उत्तम औषध आहे. बेलाची पान पचन उत्तम ठेवण्यास मदत करते.

पुढील वेब स्टोरी

अ‍ॅलोव्हेरा जेल चेहऱ्यावर लावून झोपल्याने त्वचा आणि केसांसाठी होतात फायदेच फायदे